Sunday, April 17, 2016

साजूक तूप means clarified butter and thoughts related to consuming it daily...

Read a message on whatsapp, "साजूक तूप समज आणि गैरसमज.."and appreciated the message and the reasoning behind eating it and hence decided to reproduce it and also write a post on it. It is sad that, many (including our Allopathy Doctors)  spread a word otherwise and unnecessarily we abandon eating it in our daily diet.

My father would always argue in favour of eating साजूक तूप, saying it is an important element to be included in our diet as per Ayurveda, but somehow, I always ignored his advice and avoided as much possible. Well, it not that, I donot like साजूक तूप, but fear of gaining weight, prevented me from eating it.

In fact, if you give a deep thought behind the making of साजूक तूप, our ancestors were great thinkers and perfect scientist. India has been known as a land flourished with cattle's. With cattle's, naturally we got good quality milk and then it was converted into milk products. 

Since ours is a land of heat and dust and with no refrigerators in the olden days, our ancestors might have come up with clarifying the butter to make  साजूक तूप to further preserve it, as butter goes bad soon. I have never tried it, but I have read that, one can preserve साजूक तूप for a year or so without refrigeration. Isn't this incredible?

How to prepare it? I will write another post on the preparation of साजूक तूप, as it is one of most common item of any Maharashtrian houshold and while making it, one need to take extreme care to make a perfect साजूक तूप as the colour, texture and smell, all 3 matter a lot.

I also know and remember few more uses of  साजूक तूप for applications, besides given and discussed below by Shri.Arvind Joshi,.
1) to apply to eyes, if swollen or if one has some infection
2) to make kajal (collect soot using a tiny vessel) for babies from the flame of साजूक तूप,
3) to apply to lips, when they dry due to extreme cold.

And the whatsapp message is as follows:

साजूक तूप समज आणि गैरसमज...अरविंद जोशी
तूप खाल्ले की जाडी वाढते असा एक समज आपल्याकडे आहे. अतिशय योग्य आहे मात्र कोणते तूप? साजूक तूप कि वनस्पती तूप? दोन्ही तुपातील नेमका फरक समजून घेऊ.
१)      वनस्पती तूप: हे तूप कसे तयार करतात याची माहिती अनेकांना नाही. वनस्पती तूप म्हणजे hydrogenated vegetable oil  हे कसे तयार करतात? निकेल अथवा प्लँटीनम धातूच्या संपर्कातून हायड्रोजन वायू खाद्य तेलात मिसळतात. (याचा शोध युरोपात लागला आहे हा प्रकार भारतीय नाही.) हे केल्यावर तेल घट्ट होते आणि तुपासारखे दिसते म्हणून त्याला आपण वनस्पती तूप म्हणतो.
२)      साजूक तूप गायीच्या अथवा म्हशीच्या दुधापासून दही ताक लोणी तयार करून ते कढवून साजूक तूप तयार केले जाते. बाजारात मिळणारे साजूक तूप हे दुधातून क्रीम वेगळे करून कढवून म्हणजेच त्यातील पाण्याचा अंश काढून टाकून तयार केलेले असते.
जेव्हा आपण वनस्पती तूप खातो तेव्हा प्रत्यक्षात आपण तेल खात असतो. त्यामुळे फ्याट / जाडी वाढते हे नक्की. मात्र जेव्हा साजूक तूप खातो  तेव्हा जाडी मुळीच वाढत नाही उलट साजूक तुपामुळे आतड्यांना आवश्यक मऊ पणा येतो. चयापचय क्रिया सुधारते.
एक गोष्ट लक्षात घ्या साजूक तूपाचा शोध आपल्या पूर्वजांनी लावला आहे युरोपियन लोकांनी नाही.
साजूक तुपाचे उपयोग:
१)      सर्दी झाली कि नाकात तूप सोडतात. याने नाक मोकळे होते. नाकातील हाड वाढले तर तूप जरूर सोडावे नक्की फायदा होतो.
२)      साजूक तूप खाल्ल्याने पोटातील व्रण (अल्सर) बरे होतात.
३)      गायीच्या तुपाने पोटातील कॅन्सर बरा व्हायला मदत होते.
४)      संडासला आग होत असल्यास साजूक तुपाचा फायदा होतो.
५)      सुंठ साखर आणि साजूक तूप खाल्ल्याने जुलाब थांबतात.
६)      एक चमचा तूप व दोन चमचे मध अथवा दोन चमचे तूप आणि एक चमचा मध (व्यस्त प्रमाण महत्वाचे) हे अतिशय उत्तम टॉनिक आहे.
७)      साजूक तुपाने उष्णतेचे विकार बरे होतात.
८)      आतड्यांना वंगण होते. त्यामुळे संडासला साफ होते व पाचक रसांची निर्मिती चांगली होते.
९)      साजूक तुप खाल्याने नजर सुधारायला उपयोग होतो.
प्रयोग:एक चमचा साजूक तूप व एक चमचा साखर एकत्र करून खावे आणि वरून कपभर कोमट पाणी प्यावे. असे रोज सकाळी शक्यतो अनाशा पोटी व रात्री झोपण्यापूर्वी करावे. हा प्रयोग सलग ७ दिवस करून वजनातील फरक जरूर बघावा.
मधुमेही लोकांनी साजूक तूप नुसते खावे आणि वरून कोमट पाणी प्यावे. मात्र पाण्यात तूप घालून खाण्यापेक्षा वरून कोमट पाणी प्यावे हे उत्तम.
अनुभव:
१)      १९६५ साली मला पोटात खूप दुखत होते. अल्सर होता. आईने मला एका वैद्यांकडे नेले. त्यांनी मला दररोज ४ टेबल स्पून साजूक तूप खाण्यास सांगितले. मी १५ दिवस केल्यावर चांगला फरक जाणवला. तेव्हा पासून आज पर्यंत मी रोज ४ टेबल स्पून साजूक तूप नियमितपणे खातो. त्या नंतर मला पोटाचा त्रास कधीही झाला नाही. माझे वजन एकदम नॉर्मल आहे आणि जाडीही वाढली नाही.
२)      एक पेशंट माझ्याकडे आल्या. २५ वर्षे अँसिडीटीचा त्रास आहे असे सांगितले त्यांना तूप साखरेचा प्रयोग सांगितला दुसर्याच दिवशी त्यांनी चांगला फरक पडल्याचे सांगितले.
३)      माझ्या एका मद्रासी मित्राच्या बहिणीला तूप साखरेचा प्रयोग सांगितला. तिला संडासला साफ होत नव्हते. काहीही खाल्ले तरी उलटी व्हायची. अन्नावरची इच्छा उडाली होती. एक महिन्याने तिने मित्राला फोन करून सांगितले कि साजूक तूप हे अमृत आहे. त्याने मला खूप फायदा झाला आता मी सगळे काही खाते.
४)      माझ्या मुलाला रात्री अँसिडीटीमुळे झोप येत नसेल तर दोन चमचे नुसतेच साजूक तूप खातो त्यामुळे त्याला शांत झोप लागते.
५)      हा प्रयोग आज पर्यंत ज्यांनी ज्यांनी केला आहे त्या सर्वांनाच फायदा झाला आहे. कोणाचेही वजन वाढले नाही.
आपल्याला काहीही शंका असल्यास मला जरूर विचाराव्यात.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
Source: WhatsApp.

No comments:

Post a Comment