Saturday, April 9, 2016

चैत्रगौर

चैत्र महिना लागला कि अनेक गोष्टींचे वेध लागतात.

 
वसंत ऋतु,
कोकिळ कुजन,
झाडाची कोवळी पोपटी पालवी,
फुलांचे ताटवे,
अंगण सडा,आंबरस ,
कैरीचे पन्हे ,डाळ,गुळांबा,
उन्हाळी सुट्ट्या,
उन्हाळी वाळवण,
थंडगार वाळा,
मोगरीची फुलुन आलेली  रोपटी ,
चैत्रांगण रांगोळी,
आणि
माहेरवाशिण म्हणून येणारी चैत्रगौर.....!!!





 






     


 
या वेळी द्वीतियेचा क्षय झाला आणि काल तृतीय तिथीला चैत्रगौर बसली.
 झोक्यावर बसलेली चैत्रगौर ही घरी माहेरपणाच्या विसाव्याला आलेली माहेरवाशिण.
 झोक्या मधे तीची  हिरवी साडी चोळी नेसुन स्थापना केली जाते.
 माहेरवाशिणच ती ...
 त्यात ती माहेरी येते ते समृध्दीोचा आशिर्वाद घेउन.
 सृष्टीतही त्यावेळी
सृजन वेळ चालु असते. सृजनवेळ हा शब्द मी
डॉक्टर सरोजीनी बाबर यांच्या '
' गावाकडचे सण ' ह्या खुप पूर्वी माझ्या आठवणीत सुहासिनी ह्या दिवाळी अंकातल्या लेखात चैत्र महिन्यासाठी
वापरलेला आहे.
असो
हिरवा पोपटी निसर्ग ह्या दिवसात जणु ऋतुवती होत असतो म्हणुन चैत्रगौरीलाही हिरव्या रंगाची वस्त्रे नेसावयची प्रथा असावी.
पुरणपोळी,कैरीची डाळ,करंज्या,असा सुंदर प्रसाद तीच्यासाठी केला जातो.
महिनाभर येणाऱ्या या माहेरवाशिणी साठी ...
हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी करतात.




 हिरव्यागार वस्त्रातली चैत्रगौर..
तीच्या भोवती मोगरीचा वळेसर ,
शुभ्रकंठी  साखरवर्खी गाठीचे वेढण,
  पायऱ्या वर मांडलेली आरास ..
  कलींगडाची लाल चुटुक फोड ...
भोवती रचुन ठेवलेले फराळाचे पदार्थ ,
      फुलांची सजावट ....
साड्यांचे बाजुनी सोडलेले पडदे ..
  आणि हळदीकुंकवाच्या दिवशी अंगणात केलेले सडासारवण ...


सुंदर रेखिव ठिपक्यांची रांगोळी ....
म्हणजे चैत्रातला वसंतोत्सवच.
  वेलची केशराचे
कैरीचे पन्ह,
भिजवलेले हरभरे,
आणि काकडीचे काप
सोबत द्रोणात  दिलेली कैरीची डाळ ....!!!
खरच
किती सुंदर सण आहे ना? I
चैत्रोत्सोव ....
वसंतोत्सव....!!!
पहा ना बाहेत ग्रिष्म पेटुन उठलाय ...
तरीही झाडावेलीनी ल्यालेली पोपटी हिरवी चादर ..
मग त्या रणरणत्या उन्हाची काहीली कमी व्हावी ...
डोळ्यांना थंडावा मिळावा ..
म्हणून
फुलांचा सजवलेला दिमाखदार गालिचा ....
ग्रीष्माच्या झळाना उतारा म्हणून वाऱ्याच्या मंद झुळुका ...
   खरी ही चैत्र गौरीची आरास निसर्गाने मांडलेली
किवा
पुजा म्हणुया का आपण?
   म्हणूनच या सुंदर ऋतु मासाचे स्वागत आणि या सुंदर ऋतु मासाच्या खुप शुभेच्छा....!!!!


आमच्या कडे गौर बसवतात. (गौर म्हणजे अन्नपूर्णा, जी आपण लग्नात आई कडून घेवून येतो ती) ही गौर, काही 

जण झोपाळ्यात तर काही तांदूळ वाटीत घालून त्यात बसवतात. देवघरातच तीला वेगळी बसवून एका भांड्यात 

पाणी ठेवून त्यांवर कैरी ठेवतात. असं समजतात की, ही गौर आपल्या माहेरी महिनाभर आली आहे. म्हणून तीला 

गऱ्व, तीचे कौतुक करायचे. करंजी, कैरीची डाळ, पन्हे, असे करायचे आणि त्या निमीत्ताने मैत्रीणींना हळदी-कुंकू 

देऊन ओटी हरभरे भिजवून भरायची. नैवेद्य ही असतो देवीला. पूरण, खीर वगैरे. अक्षय तृतीयेला तीची पुन्हा 

ओटी भरुन दुसरा्या दिवशी गौर उडवतात. ज्या दिवशी हळदी-कुंकू असतं, त्या दिवशी तीला देवघरातून बाहेर 

आणुन, मी हिरवळीत बसवते. - एका मैत्रीणी ने तीच्या घरच्या चैत्र गौरी चे केलेले वर्णन.

No comments:

Post a Comment