I got a very interesting and authentic message from one of my aunt and thought of sharing as it is.
|| श्री स्वामी समर्थ ||
|| ऐं ||
गुढीपाडवा नवीन वर्षानिमित्त करावयाच्या विशेष सेवा.................
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
1) ब्रह्मध्वजारोहण म्हणजेच गुढी उभारणे.
☆ पहाटे सुर्योदयापुर्वी ( सूर्योदय सकाळी 6 : 38 ) उठून सुगंधी तेल व उटणे लावून अभ्यंगस्नान करावे.
अभ्यंगस्नानानंतर स्वच्छ वस्त्र परीधान करून अंगणात श्री लक्ष्मी पद्म , श्री गायत्री पद्म व नवग्रहांची रांगोळी काढून प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे व
गुढी उभारावी.
गुढी उभारावी.
शास्त्रोक्तरीत्या गुढी उभारण्याची कृती
व पूजन विधी
☆☆☆☆☆☆☆☆☆
व पूजन विधी
☆☆☆☆☆☆☆☆☆
☆कृती☆
सूर्योदयापुर्वीच एका वेळूच्या काठीस तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावे , काठीस हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत , नंतर काठीच्या टोकाला नवीन वस्त्र घडी करून ठेवून त्याच्या समवेत कडूनिंबाचा पाला , चाफ्याच्या फूलांची व साखर गाठीची माळ या जिनसा एका सूत्राने पक्क्या बांधून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढलेला तांब्याचा कलश उपडा झाकावा.ही गुढी आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर उभी करत पक्की बांधावी.

☆ पूजन विधी ☆
☆ प्रथम हात जोडून ब्रह्मध्वजाचे ध्यान करावे.
ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
ध्यायम् ध्यायामी !
नमस्काराणि समर्पयामि !!
¤ गुढीवरील तांब्याच्या कलशावर कुंकवाने काढलेल्या स्वस्तिकाच्या मधोमध गंध , अक्षता , हळदी , कुंकु वहावे.
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
विलेपनार्थे चंदनं समर्पयामि !
अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि !
हरिद्रां कुंकूंमं सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि !!
☆ गुढीस फूलांचा हार घालावा.
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
ऋतू कालोद्भव पूष्पमालाणि समर्पयामि !!
☆ गुढीस धूप ओवाळावा.
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
धूपं आघ्रापयामि !!
☆ गुढीस दिवा ओवाळावा.
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
दिपं दर्शयामि !!
☆ गुढीस मिरे , हिंग , मीठ , ओवा , साखर , कडुनिंबाच्या फूलांसह कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून
या मिश्रणाचा नैवेद्य दाखवावा.
या मिश्रणाचा नैवेद्य दाखवावा.
ॐ ब्रह्मध्वजाय नमः !
नैवेद्यं समर्पयामि !!
गुढीसमोर जमिनीवर उजव्या हाताच्या
मधल्या दोन बोटांनी पाण्याचा चौकोन करून त्यावर नैवेद्याची वाटी ठेवावी व तिच्या भोवती उजव्या हाताने तीन वेळा पाणी फिरवावे.
मधल्या दोन बोटांनी पाण्याचा चौकोन करून त्यावर नैवेद्याची वाटी ठेवावी व तिच्या भोवती उजव्या हाताने तीन वेळा पाणी फिरवावे.
सत्यंत वर्तेन् परि सिंचयामि !
असे म्हणून गायत्री मंत्र म्हणावा व त्यानंतर
ॐ प्राणाय स्वाहा !
ॐ अपानाय स्वाहा !
ॐ व्यानाय स्वाहा !
ॐ उदानाय स्वाहा !
ॐ समानाय स्वाहा !
ॐ ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा !
ॐ अपानाय स्वाहा !
ॐ व्यानाय स्वाहा !
ॐ उदानाय स्वाहा !
ॐ समानाय स्वाहा !
ॐ ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा !
असे म्हणावे.
यानंतर,
मध्यपाणियं समर्पयामि !
असे म्हणून पळीभर पाणी ताम्हणात सोडावे.
परत नैवेद्याभोवती पाणी फिरवावे व वरीलप्रमाणे गायत्री मंत्र , ॐ प्राणाय स्वाहा......इ. मंत्र म्हणावे.
परत नैवेद्याभोवती पाणी फिरवावे व वरीलप्रमाणे गायत्री मंत्र , ॐ प्राणाय स्वाहा......इ. मंत्र म्हणावे.
खालील मंत्र म्हणत तीन पळ्या पाणी ताम्हणात सोडावे.
उत्तरापोशनं समर्पयामि !
हस्त प्रक्षालनं समर्पयामि !
मुख प्रक्षालनं समर्पयामि !
खालील मंत्र म्हणत गुढीस गंध अक्षता हळदी कुंकु वहावे.
करोव्दर्तनार्थे चंदनं हरीद्रा कुंकूमं सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि !
मग हात जोडून पूजेत झालेल्या चूकांबद्दल गुढी देवतेस क्षमा मागावी...,शेवटी हातात पाणी घेऊन खालील मंत्र म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे.
अनेन मया यथाज्ञानेन यथामिलित उपचारद्रव्यै कृत पंचोपचार पूजनेन श्री ब्रह्मध्वज देवता प्रीयतां न मम् !!
टीप :- दूपारी 4 चे आत गोड धोड नैवेद्य दाखवून गुढी उतरवावी.
2) उगवत्या सूर्याला अर्घ देत नवीन वर्षाचे हसतमुखाने व पवित्र अंतःकरणाने स्वागत करावे...
3) पंचांगस्थ गणपती पूजन :-
घरातील देवपूजेनंतर एका पाटावर लाल कापड अंथरून त्यावर नवीन पंचांग ठेवावे.
" वक्रतुण्ड महाकाय......"
हे ध्यान करून गुढी प्रमाणे पंचांगावरील गणपतींचे
" ॐ रीध्दी सिध्दी सहित पंचांगस्थ गणपतये नमः ! "
या नाममंत्राने पंचोपचार पूजन करावे.
नैवेद्य गूळ खोबर्याचा दाखवावा.
पूजनानंतर पंचांगातील पहिल्या पानावरील संवत्सर फल वाचावे.
4) चैत्र पाडव्याच्या दिवशी वडाच्या झाडाची तीन इंच लांबीची मुळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची वरीलप्रमाणे पंचोपचार पूजा "ॐ वं वनस्पतये नमः !" या नाममंत्राने करावी नैवेद्य खडीसाखरेचा दाखवावा व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतून खिळ्यास टांगावे.
या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तीचे आजार, बाधा व संकटे यापासून संरक्षण होते.

5) धन धान्य समृद्धीकारक तोडगा
हा तोडगा गूढी पाडव्यास किंवा या दिवशी जमले नाही तर कुठल्याही बुधवारी शुभ योग असतांना करावा.
मागील वर्षाची जूनी पोटली पवित्र प्रवाहात विसर्जन करुन नविन पोटली तयार करावी.
तांब्याचा एक गोल तुकडा, तांब्याच्या छोट्या पादुकांचा जोड, नवे गहू एक मुठ, एक अखंड हळदीचा तुकडा, एक मोठा हिरडा, एक मिठाचा खडा, एक मुठ नागकेशर इ. साहित्य हळदीने पिवळ्या केलेल्या कपड्यात घालून पिवळ्या दोर्याने शिवून पोटली तयार करावी. नंतर त्या पोटलीची " ॐ श्रीं श्रीयै नमः ! " या नाममंत्राने पंचोपचार पूजा करावी, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
नंतर ती पोटली उजव्या हातात घेऊन "श्री स्वामी समर्थ " मंत्र - 1 माळ
"श्री लक्ष्मी गायत्री" मंत्र - 1माळ
"श्री विष्णू गायत्री" मंत्र - 1 माळ
"श्री कुबेर मंत्र" - 1 माळ
जप करुन तिला गुग्गुळाचा धूप देवून घराच्या ईशान्य कोपर्यात पिवळ्या दोर्यानीच ती पोटली बांधावी.

6) दुपारी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात मधोमध खड्डा करावा, त्या खड्ड्यात 1 वेळा भूसूक्त म्हणत अभिषेक करून एक माणूस जेवेल एवढा नैवेद्य ठेवावा व " हे भूमीरूपिणी सिता माते आपल्याच कृपेने प्राप्त झालेल्या या अन्नाचा नैवेद्य आपणास अर्पण करत आपल्या या असिम कृपेबद्दल धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करतो."
अशी विनंती करून तो नैवेद्य त्या खड्ड्यातच पूरून टाकावा.
अशी विनंती करून तो नैवेद्य त्या खड्ड्यातच पूरून टाकावा.
याज्ञिकी प्रशिक्षण विभाग
गुरूपीठ
त्र्यंबकेश्वर
गुरूपीठ
त्र्यंबकेश्वर
No comments:
Post a Comment